मुंबई

मुंबईत रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक; तर पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन मेगाब्लॉक

मुंबई – उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी 21 मार्च रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सीएसएमटी ते विद्याविहार आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी मेगा ब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील माहीम ते वांद्रे आणि बांद्रा ते अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

सीएसएमटी-विद्याविहार मेगाब्लॉक-
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते संध्याकाळी 3.55 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉग दरम्यान सीएसएमटी डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविल्या जातील. त्यापुढे निर्धारित डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा वळविल्या जातील. घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल सेवा विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत मस्जिद, स्टॅंडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करीरोड आणि विद्या विहार रेल्वे स्थानकावर या धीम्या मार्गावरील लोकल सेवा थांबणार नाही.

हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक-
हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/ वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान अप व डाऊन मार्गावर सकाळी 11.40 वाजता ते सायंकाळी 4.40 वाजेपर्यत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी आणि वडाळा रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या डाऊन आणि पनवेल/बेलापूर/ वाशी येथून सुटणाऱ्या अप मार्गावरील लोकल सेवा ब्लॉक दरम्यान रद्द करण्यात येणार आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून वांद्रे / गोरेगावकडील अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. या ब्लॉगदरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नयेत, म्हणून पनवेल ते कुर्ला आणि कुर्ला ते सीएसएमटीसाठी विशेष लोकल गाड्या कुर्ला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 8 वरून चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आलेला आहे. या ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मध्य रेल्वेच्या मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गावरुन प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन मेगाब्लॉक-
पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी रविवारी माहीम ते वांद्रे आणि बांद्रा ते अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. हा ब्लॉक सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत असणार आहे. या ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील गोरेगाव कडे जाणाऱ्या लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे यासह पश्‍चिम रेल्वेमार्गावरील चर्चगेट ते गोरेगाव काही लोकल सेवा रद्द केल्या जाणार आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!