ठाणे

राष्ट्रवादी कल्याण-डोंबिवली जिल्हा कार्याकारणी जाहीर.. पुन्हा ज्येष्ठ कार्यकर्त्याकडे अध्यक्षपद

 डोंबिवली ( शंकर जाधव ) राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टिची जिल्हा कार्यकारणी उशिरा का होईना जाहीर झाली.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सुचनेनुसार जिल्हा कार्यकारणी, नवीन विधानसभा अध्यक्ष,कार्याध्यक्ष,सरचिटणीस पदाची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे व कार्याध्यक्ष डॉ.वंडार पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्या नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.डोंबिवलीतील विधानसभा अध्यक्षडाची माळ पुन्हा एकदा ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या गळ्यात पडली.तर अध्यक्षपद मिळाले नसल्याने डोंबिवलीतील एका खंदा कार्यकर्ता नाराज झाला होता.

कल्याण पश्चिमेकडील ठाणे जिल्हा केमिस्ट अॅड ड्रगिस्ट असोसिएशन सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टिची जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली.डोंबिवली विधानसभा अध्यक्षपदी सुरेश जोशी,कार्याध्यक्षपदी नंदू मालवणकर, कल्याण-डोंबिवली जिल्हा सरचिटणीसपदी समीर गूधाटे, सुनीता काटकर, अजित साटम, जिल्हा उपाध्यक्ष राजेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली.मात्र कार्याध्यक्षपदी भाऊ पाटील यांनी नियुक्ती करण्यात आली असली तरी पाटील हे डोंबिवली विधानसभा अध्यक्षपदी इच्छुक होते.म्हणून त्यांनी सदर कार्यक्रमात उपस्थित असूनही कार्याध्यक्षपद स्वीकारले नाही.एकीकडे माजी नगरसेवक सुरेश जोशी यांना अध्यक्षपद मिळाल्यावर पक्षवाढीसाठी ते कोणती चाल खेळतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागेल आहे. तर दुसरीकडे तरुण तडफदार कार्यकर्ता नाराज झाल्याने  त्याची नाराजी पक्षश्रेष्ठीं कशी दूर असा प्रश्नही कार्यकर्त्यांना पडला आहे.भाऊ पाटील यांना त्यांच्या नाराजीबाबत विचारले असता ते म्हणाले नियुक्ती करताना पक्ष पक्षश्रेष्ठींनी डोंबिवलीतील कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नाही.मी अनेक दिवसांपासून पक्षश्रेष्ठींकडे माझ्या कामाची माहिती दिली होती.पक्षवाढीसाठी करत असलेले प्रयत्नांबाबतहि त्यांना सांगितले होते.

तसेच कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्षपदी संदीप देसाई,कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्षपदी अर्जुन नायर,कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्षपदी दत्ता वझे यांची नियुक्ती करण्यात आली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!