महाराष्ट्र

राज्यातील नगरपरिषदांमधील विकासकामांचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

मुंबई, : चंद्रपूर महापालिकेसह कणकवली, मालवण व सिल्लोड नगरपरिषदेच्या हद्दीतील विविध विकास कामांचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध बैठकांच्या माध्यमातून आज आढावा घेतला.

एमएसआरडीसीच्या नेपियन सी रोडवरील कार्यालयात झालेल्या या बैठकांना मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक व भूषण गगराणी आदी यावेळी उपस्थित होते.

नगरपरिषदांच्या हद्दीतील विकासकामे वेळेत पूर्ण करताना स्थानिक प्रशासनाने रस्ते, पाणी, भुयारी गटार, घनकचरा व्यवस्थापन यासारखे प्रकल्प मार्गी लावून नागरिकांना दिलासा देण्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत परिक्षेत्रातील जागा परमपूज्य भालचंद्र महाराज देवस्थानास हस्तांतरित करण्याकरिता तसेच मालवण येथे उभारण्यात येणाऱ्या म्युनिसिपल प्लाझा आणि मत्स्यालया संदर्भातील विषयांवर चर्चा करण्यात आली. मालवण येथे होणारे मत्स्यालय पर्यटनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

चंद्रपूर महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनाबाबत चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांच्या सोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे चर्चा करून घनकचरा व्यवस्थापनाबाबत नियोजनपूर्ण व अभ्यासपूर्ण काम होण्यावर भर देण्यात यावा असे निर्देश यावेळी मंत्रीद्वयांनी दिले.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या जाहिराती फलक लावण्याबाबत चर्चा करण्यात आली जाहिरात फलकांमुळे कोणताही अपघात किंवा कोणाला त्रास होणार नाही हे तपासून निर्णय घ्यावा, असे श्री. शिंदे यांनी सांगितले. यावेळी ठाणे जलसंपदा विभाग कार्यालय व खारभूमी विभागाची जमीन यांचा क्लस्टर अंतर्गत पुनर्विकास करण्याबाबत चर्चा झाली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!