मुंबई

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

समाजमाध्यमांद्वारे कार्यक्रमाचे थेट प्रसारण

मुंबई, दि. 30 : माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते उद्या, दि. 31 मार्च 2021 रोजी सायंकाळी 5.30 वा. होणार असून या कार्यक्रमाचे विविध माध्यमांद्वारे थेट प्रसारण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष तथा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हे  स्मारक महापौर निवास,  शिवतीर्थ,  वीर सावरकर मार्ग,  दादर येथे उभारले जाणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण https://twitter.com/MMRDAOfficial अथवा   www.parthlive.com यावर तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://twitter.com/MahaDGIPR आणि  https://www.facebook.com/MahaDGIPR  तसेच सर्व जिल्हा माहिती कार्यालयांच्या ट्विटर आणि फेसबुकवरुन करण्यात येणार आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!