ठाणे

केंद्राकडून जास्तीत जास्त लसींचा पुरवठा होणे गरजेचे आहे तरच लसीकरण सुरळीत व लवकर पार पडेल – खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे

डोंबिवली (शंकर जाधव ) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असुन आज यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या दालनामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे  यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. 

या बैठकीत कोरोनाचे दिवसेंदिवस वाढत जाणारे संक्रमण कश्या प्रकारे कमी करता येईल, कुठल्या कुठल्या उपाययोजना करता येतील, भयंकर परिस्थितीत नागरिकांना जास्तीत जास्त सतर्क करण्यासाठी काय करता येईल,जास्तीत जास्त प्रतिबंधक लसीकरण केंद्र  होण्यासाठी काय करावे लागेल, ट्रेसिंग, टेस्टिंग साठी कर्मचारी वर्ग वाढविणे, होम आयसोलेशन असलेले पण निष्काळजी कोरोना रूग्णांच्या मुक्त वावरावर बंधने यावे यासाठी उपाय योजना,  ज्यांच्या घरी विलगीकरणासाठी जागा नाही अशा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त विलगीकरण केंद्राची स्थापना करणे, आजी-माजी स्थानिक लोकप्रतिनिधींना माहिती देऊन त्यांच्यामार्फत जनजागृती करणे व त्यांना संक्रमणावर नियंत्रण आणण्यासाठी सक्रिय करून त्यांची मदत घेणेकेंद्र सरकार कडून मध्यंतरीच्या काळात जी रेल्वे संशयित  कोरोना रुग्णांच्या विलगीकरण साठी तयार केली होती अशा रेल्वेची मागणी करून जास्तीत जास्त संशयित रुग्णांची व्यवस्था करणे,गेली वर्षभर महानगरपालिकेचे आरोग्य खात्याचे कर्मचारी अधिकारी प्रचंड मेहनत घेत आहेत, एकाच वेळेला ते अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना दिसत आहेत अशा वेळेला त्यांचा कामाचा भार हलका करण्यासाठी कामाचे विकेंद्रीकरण करणेपोलीस यंत्रणेच्या मदतीने जास्तीत जास्त जनजागृती व जागृकता निर्माण होईल यासाठी वेळ पडल्यास कायदेशीर मदत घेणेयाबाबतच्या उपाययोजनांवर चर्चा झाली.

सध्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या खाजगी व शासकीय अशा पंधरा रुग्णालयातील लासिकरण केंद्रा मार्फत कोरोना प्रतिबंधक लसीकरण काम सुरू आहे, दिवसाला साधारण 3000 ज्येष्ठ व 45 वर्षाच्या आपले नागरिकांचे लसीकरण होत आहे, हे फारच अपुरे आहे, दिवसाला कमीत कमी साधारण साडेसहा ते सात हजार लसीकरण होणे गरजेचे आहे परंतु त्या प्रमाणात लसींचा पुरवठा होत नाही,केंद्र सरकारने लसींचा पुरवठा सुरळीत केला तर  लसीकरण व्यवस्थित पार पडू शकते यासाठी केंद्र सरकारकडे जास्तीत जास्त लसींची मागणी करणे बाबत बैठकीत सहमती झाली…

याप्रसंगी आमदार रविंद्र चव्हाण, मा. नगरसेवक दीपेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, मा.परिवहन सभापती मनोज चौधरी, वैद्यकीय अधिकारी पानपाटिल, अश्विनी पाटील, शिवसेना मनपा प्रमुख विजय साळवी, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, राजेश कदम, माजी परिवहन सभापती, सागर जेधे हे उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!