ठाणे

अर्धवटपुल …एप्रिलफुल… मनसेचे डोंबिवलीत निषेध आंदोलन

डोंबिवली (शंकर जाधव ) : १ एप्रिल हा दिवस गम्मत म्हणून मूर्ख बनवण्याचा दिवस म्हणून समजला जातो. पण कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत अर्धवट पुलाच्या कामाबाबत मनसेचे डोंबिवलीतील ठाकुर्ली पुलावर केक कापुन पालिका प्राशसन जनतेशी खोट बोलत असल्याचे संगीतले.अर्धवटपुल …एप्रिलफुल असे हे आगळेवेगळे आंदोलन करून मनसेचे  कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन,राज्यकर्ते व महाराष्ट्र राज्य सरकारचा जाहिर निषेध केला.

‘एप्रिल फुल,डब्बा गुल, कुठे नेऊन ठेवले आमचे कल्याण-डोंबिवलीकरांचे पूल’ अश्या घोषणा करत आणि केक कापून डोंबिवली पश्चिमे मधील मनसे कार्यकर्त्यांनी अर्धवट असलेल्या ठाकुर्ली पुलावर अनोखे आंदोलन केले.’एप्रिल फुल,डब्बा गुल, कुठे नेऊन ठेवले आमचे कल्याण-डोंबिवलीकरांचे पूल’ अश्या घोषणा दिल्या.गेल्या काहीं वर्षापासून कल्याण-डोंबिवली मधील पुलांचे फार संथ गतीने चालू आहे.प्रशासन आणि सत्ताधारी यांच्याकडून वारंवार वेगवेगळ्या तारखा दिल्या जातात मात्र पूल होत नाहीत. ठाकुर्ली, पालवा, माणकोली, दुर्गाडी पुलाचे काम आद्यपही चालूच आहे.नागरिक आणि प्रवाशी हैराण झाले आहे.मात्र प्रशासन काही वेगाने काम करत नाहीत.याचा निषेध म्हणून डोंबिवली पश्चिमे मधील मनसे कार्यकर्त्यांनी १  एप्रिल रोजी अनोखे आंदोलन केल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी सांगितले.

यावेळी .”एप्रिल फुल,डब्बा गुल, कुठे नेऊन ठेवले आमचे कल्याण-डोंबिवलीकरांचे पूल”, “एप्रिल फुल,डब्बा गुल, कुठे नेऊन ठेवला ठाकुर्लीचा पूल” , “एप्रिल फुल,डब्बा गुल, कुठे नेऊन ठेवला पालवाचा पूल” , “एप्रिल फुल,डब्बा गुल, कुठे नेऊन ठेवला कोपरचा पूल” अश्या घोषणा दिल्या. या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश भोईर, शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे,संदीप (रमा )म्हात्रे, विभाग अध्यक्ष श्रीकांत वारंगे, उपविभाग अध्यक्ष हिम्मत म्हात्रे,मनविसे शहर सचिव प्रितेश म्हामूणकर, मा सचिव रस्ते आस्थापना सागर मुळ्ये ,प्रेम पाटील, संकेत सावंत,समीर पवार,समीर चाळके, भुषण घाडी उपस्थित होते.

About the author

Aapale Shahar News

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!