ठाणे

अपघात टाळण्यासाठी रस्त्याचे काम सुरू असताना वाहतुकीचे नियोजन व सुरक्षिततेच्या उपाययोजना करा!भाजपचे निलेश पाटील यांची पालिकेकडे मागणी

दिवा:- रस्त्याच्या नियोजनशून्य कामामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असताना ठाणे महापालिकेने दिव्यातील वाहतुकीचे नियोजन करावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश पाटील यांनी केली आहे.दिव्यातील रस्त्यांचे काम नियोजनशून्य व हलगर्जीपणा ने होत आहे याबाबत भाजपच्या वतीने आपण वेळोवेळी आवाज उठवला असून रस्त्याचे काम सुरू असताना सुरक्षिततेच्या उपाययोजना नसल्याने होणारे अपघात लक्षात घेऊन  ठाणे महापालिका प्रशासनाने तातडीने दिव्यातील वाहतुकीचे नियोजन करावे अशी मागणी भाजपचे निलेश पाटील यांनी केली आहे.

दिवा आगासन रस्त्यावर अनेक ठिकाणी मनमानी पध्दतीने खोदकाम करण्यात आले असून वाहनांसाठी सुरक्षितेतच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. सध्या सिंगल लेन प्रवास सुरू असताना व या एकाच लेन मधून दोन्ही बाजूच्या गाड्या जात असताना अपघात होण्याची शक्यता असते. नुकताच असा प्रकार गणेश नगर येथे घडला असून एक शाळकरी मुलगा रस्त्याचे काम सुरू असणाऱ्या गटारात सायकल वरून पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

पालिका प्रशासनाने या घटनांची गंभीर दखल घेऊन दिवा शहरातील वाहतुकीचे नियोजन करायला हवे अशी मागणी निलेश पाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!