ठाणे

उसाटणे, बुदुर्ल, नाऱ्हेण, पाली, चिरड, शेलारपाडा ते इजिमा १७६ रस्त्यास प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत अखेर मंजुरी : खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; ६.८५० लांबीच्या रस्त्यास ४६५.५९ लक्ष निधी मंजूर

• पंतप्रधान ग्रामसडक योजना-३ च्या मार्गदर्शक तत्वांनुसार मंजूर करण्यात आलेल्या रस्त्याकरिता ६०% निधी केंद्र सरकार व ४०% निधी राज्य सरकार देणार

कल्याण, : प्रधानमंत्री ग्रामसडक योजना ही १००% केंद्र पुरस्कृत योजना असून राज्यात सन २००० पासून राबविण्यात येत आहे. सदर योजनेची अंबलबजावणी ग्रामविकास विभागाच्या आधिपत्याखालील महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत करण्यात येते. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा मुख्य उद्देश हा सर्वसाधारण व बिगर आदिवासी भागातील १००० पेक्षा जास्त व आदिवासी भागातील ५०० पेक्षा जास्त लोकवस्तीची न जोडलेली गांवे बारमाही रस्त्यांद्वारे जोडणे हा आहे. सध्या सदर योजनेअंतर्गत बिगर आदिवासी भागात ५०० पेक्षा जास्त व आदिवासी भागातील २५० पेक्षा जास्त लोकवस्तीची न जोडलेली गावे बारमाही रस्त्यांद्वारे जोडण्याबाबतच्या प्रस्तावास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे.

सदर योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघांतर्गत येत असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे, बुदुर्ल, नाऱ्हेण, पाली, चिरड, शेलारपाडा ते इजिमा १७६ रस्ता नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने दुरूस्त होणे गरजेचं होते. हा रस्ता अंत्यत नादुरूस्त असून त्यामुळे नागरिकांची दळणवळणाच्या दृष्टीने गैरसोय होत होती. तसेच स्थानिक पातळीवरील ग्रामस्थांकडून सुद्धा या रस्त्याच्या नुतनीकरणाची वारंवार मागणी होत आलेली आहे. या रस्त्यासाठी खा.डॉ.शिंदे यांनी पाठपुरवठा केला होता, आणि या पाठपपुराव्याला यश देखील प्राप्त झाले. जेणेकरून त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांना नादुरुस्त रस्त्यामुळे होणारा त्रास कमी व्हावा, व नागरिकांना दळणवळणासाठी सुसज्ज असा रस्ता असावा, अशी मागणी खा.शिंदे यांनी आपल्या पत्राद्वारे प्रधान मंत्री ग्रामसडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेकडे केली होती, त्याप्रमाणे खा.डॉ. शिंदे हे प्रतिनिधित्व करीत असलेल्या कल्याण लोकसभा मतदार संघातील अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे, बुदुर्ल, नाऱ्हेण, पाली, चिरड, शेलारपाडा ते इजिमा १७६ हा रस्ता ६.८५० लांबी (कि.मी) चा असून त्यास ४६५.५९ लक्ष मार्च महिना अखेर मंजुर केले असल्याचे खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!