डोंबिवली ( शंकर जाधव ) : कोरोनाची दुसरी लाट असल्याने प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ३० एप्रिल पर्यत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.या निर्णयाच्या विरोध करत डोंबिवलीतील व्यापाऱ्यांनी स्टेशनपरिसर, केळकर रोड, फडके रोड येथील बंद दुकानाच्या बाहेर निषेधाचे फलक घेऊन उभे राहिले.यात दुकानदारांबरोबर दुकानात काम करणारे कर्मचारीही निषेध करण्यासाठी उभे होते.कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करू पण दुकांने बंद करून आम्हाला उपाशी मारू नका अशी मागणी यावेळी दुकानदारांनी शासनाकडे केली. यावेळी पोलीस निषेध करणाऱ्या व्यापाऱ्यांवर बारीक लक्ष ठेऊन होते.कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल करू असे पोलिसांचे म्हणणे होते.यावेळी फेरीवाला संघटनेनेही व्यापाऱ्यांनीबरोबर उभे राहून निषेध नोंदवला.कल्याण-डोंबिवली येथील दुकानदार दुकान सुरू करायचा की नाही यासंदर्भात संभ्रमात होते.मात्र दुकान चालू ठेवले नाही तर पोटापाण्याचा प्रश्न उपस्थित होईल या कारणास्तव डोंबिवलीतील दुकानदारांनी स्वतःच्या दुकानासमोरच निषेध व्यक्त करत हातात फलक घेतले आहे.यावेळी सोशल डिस्टंसिंग नियम सांभाळत निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील परवानगी असलेल्या खाद्य आणि किराणा दुकानाबाहेर नागरिकांनी नाकाच्या खाली मास्क घेत पार्सल घेत होते. तर कैलास लस्सी दुकान आणि जवळील दुकानात नागरिक मास्क तोंडावर न घेता गर्दी करून उभे होते.तर फेरीवाल्यांनी आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सरकारने सोडवावा अशी सरकारकडे विनंती केली.