डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर येथील बहुचर्चित अनधिकृत बांधकामावर अखेर गुरुवारी पालिकेने हातोडा मारला.सदर बांधकामावर पालिका कधी कारवाई करणार असा प्रश्न नागरिकांना पडला होता.पालिकेच्या नाकावर टिच्चून या ठिकाणी बांधकाम सुरू होते.पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी शहरातील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करा असे निर्देश दिले होते. तरीही कोणाच्या आर्शिवादाने सदर ठिकाणी बांधकामावर पालिका का कारवाई करत नाही असा प्रश्न पत्रकार आणि नागरिकांना पडला होता.
गुरुवारी डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर येथे अनधिकृत बांधकावर पालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात कारवाई केली.कारवाई सुरू असताना या ठिकाणी खूपच गर्दी झाल्याने पोलिसांनी नागरिकांना लांब उभे राहण्यास सांगितले.वास्तविक सदर अनधिकृत बांधकामावर यापूर्वीच कारवाई होणे अपेक्षित होते.मात्र पालिका प्रशासन या बांधकामावर का कारवाई करत नाही असा प्रश्न नागरिकांना पडला होता.अखेर गुरुवारी सकाळी सदर ठिकाणी पालिका प्रशासनाने कारवाईस सुरुवात केली.सुरुवातील या ठिकाणी वाद होत होता मात्र पोलिस आणि पालिका प्रशासनाने कोणालाही न जुमानता अनधिकृत बांधकामावर हातोडा मारण्यास सुरुवात केली.डोंबिवलीत या ठिकाणे हे अनधिकृत बांधकाम कोणीही तोडू शकणार नाही असा आवेशात या बांधकामाचा विकासक होता.शहरातील हे सुरू असलेल्या या बांधकामावर कारवाई करणे हे पालिकेसमोर एकप्रकारे आव्हान होते अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.गुरुवारी पालिका प्रशासनाने या ठिकाणच्या बांधकामावर कारवाई करून विकासकाला चांगलीच चपराक दिली आहे.दरम्यान या ठिकाणी पुन्हा अनधिकृत बांधकाम होणार नाही याकडे पालिकेने लक्ष देणे आवश्यक आहे.