डोंबिवली ( शंकर जाधव ) : बसपचे महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष दयानंद किरतकर यांचे बुधवारी १४ एप्रिल रोजी कोरोनाने निधन झाले. निधन समयी ते ५९ वर्षांचे होते. सुरुवातीच्या काळात रिपाई (आठवले गट) या पक्षात रिपाईचे प्रल्हाद जाधव , अंकुश गायकवाड यांच्या समवेत काम केले. त्यानंतर २००९ साली त्यांनी बसप मध्ये प्रवेश घेतला आणि आपल्या कामामुळे मायावती यांनी त्यांना महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष पद बहाल केले. मूळचे विक्रोळीच्या असणारे किरतकर १९८० क्या दरम्यान डोंबिवलीत आले. डोंबिवलीकरांना काही चाळीत राहणाऱ्या नागरिकांना त्यांनी घरे देखील मोफत दिली. ३ एप्रिल पासून ते एम्स हॉस्पिटल येथे कोरोनावर उपचार घेत होते. मात्र बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. डोंबिवली पूर्व येथील शिवमंदिर जवळील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी , मुलगा , भाऊ आणि इतर परिवार आहे.
बसपाचे महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष दयानंद किरतकर यांचे निधन
April 15, 2021
59 Views
1 Min Read

-
Share This!