डोंबिवली ( शंकर जाधव ) : शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि माजी नगरसेविका गुलाब म्हात्रे यांच्यावतीने कोपर येथे दोन दिवसीय कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. ज्या मंडळींना पहिला डोस घ्यायचा आहे, त्या नागरिकांना पहिला डोस तर ज्या नागरिकांना दुसरा डोस घ्यायचा आहे त्या नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. सोशल डिस्टन्स पाळून हे लसीकरण सुरु असल्याचे युवा नेते प्रविण म्हात्रे आणि उपशहरप्रमुख किशोर मानकामे यांनी दिली. यावेळी डोंबिवली पश्चिम महिला शहर प्रमुख किरण मोंडकर, सीमा अय्यर, किरण भोसले , अनिल म्हात्रे, गणेश मोगविरा, गोत्या सावंत यांच्या सहकार्याने हे शिबिर संपन्न झाले.
शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे तर्फे लसीकरण केंद्र
April 16, 2021
38 Views
1 Min Read

-
Share This!