ठाणे

प्रसिद्ध गायक मिलींद प्रल्हाद शिंदे यांच्या पत्नी ज्योती शिंदे यांचा कोरोना मुळे दुदैवी अंत.

कल्याण – संपुर्ण महाराष्ट्राला आपल्या गायकीने वेड लावणाऱ्या शिंदे शाही घराण्यातील सुप्रसिद्ध गायक मिलींद प्रल्हाद शिंदे यांच्या पत्नी ज्योती मिलींद शिंदे यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी सोमवारी पहाटे ५ च्या दरम्यान कल्याणच्या एका खाजगी रुग्णालयात कोरोना मुळे दुदैवी अंत झाला आहे . ज्योती शिंदे या गेली ६ दिवस कोरोनाशी झुंज देत होत्या, या दरम्यान त्यांना रेमडीसीव्हीर इंजेक्शनचे ६ डोसही देण्यात आले होते, परंतु हे डोसही ज्योती शिंदे यांचे प्राण वाचवू शकले नाहीत . ज्योती शिंदे यांच्या पश्चात पती मिलींद शिंदे, अंकूश, मयुर ही दोन विवाहीत मुले, दोन सुना, तर अविवाहीत मुलगा मधुर आणि अविवाहीत मुलगी स्वरांजली, पती असा परिवार आहे .

गेल्या सहा दिवसांपूर्वी मिलींद आणि ज्योती या दांपत्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना उपचारार्थ दुर्गाडी जवळील एका खाजगी कोवीड रुग्णालयातील एकाच वॉर्ड मध्ये औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले होते . ज्योती यांचे कालच रेमडीसेव्हर इंजेक्शनचे ६ डोस पूर्ण झाले होते . परंतु आज पहाटे ५ चे दरम्यान औषधोपचार चालु असतांनाच त्यांची प्राण ज्योत मालवली .सध्या याच रुग्णालयात मिलींद शिंदे यांचेवरही औषधोपचार चालु असुन त्यानाही आज पर्पंत रेमडीसेव्हरचे ४ डोस देण्यात आले आहेत .

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!