कल्याण ( शंकर जाधव ): कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रत कोरोना रु ग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनावर आरोग्य सेवा पुरविताना ताण येत आहे. कल्याण पूवेर्तील शक्तीधाम व विठ्ठलवाडी स्टेशन समोरील महिला आधार केंद्र येथे कोविड रुग्णालय तातडीने सुरू करावे अशी मागणी भाजपचे कल्याण पूव्रेतील आमदार गणपत गायकवाड यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयात बेड्स आणि ऑक्सीजनची कमतरता जाणवू लागली आहे. सर्वत्र आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. रुग्णांना ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर, रिमेडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत. काही रुग्णांना तर बेड मिळत नसल्याने जीव गमावावा लागत आहे. तर काही रुग्ण सुविधेच्या अभावी रुग्णालयाच्या गेटवर तासन्तास उभे आहेत. अशा परिस्थितीत कल्याण पूव्रेतील शक्तीधाम व विठ्ठलवाडी स्टेशन समोरील महिला आधारकेंद्रात महापालिकेने तातडीने कोविड रुग्णालय सुरू करावे. याठिकाणी कोविड रुग्णालय सुरू झाल्यास कल्याण पूव्रेतील रुग्णांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळेल असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.