ठाणे दि २८ : कोविड काळात रुग्णांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत. दानशूर मंडळी सढळ हस्ते मदत, सहकार्य करत आहेत.ठाणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समिती सभापती यांनी या परिस्थितीचे भान राखत त्यांना मिळणारे मानधन , सर्व भत्ते कोविड रुग्णासाठी खर्च करावेत अशा स्वरूपाचे लेखी निवेदन सोमवारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले.
भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्णा गटाचे ते प्रतिनिधित्व करतात. सध्या ते जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समिती सभापती पदावर कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला असून कोव्हिड काळात देखिल प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन तेथील आरोग्य व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली होती
ग्रामीण भागात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात ते अग्रेसर असून मुलींच्या जन्माचे स्वागत कुटूंबात व्हावे यासाठी त्यांच्या दापोडे ग्रामपंचायत क्षेत्रात जन्माला येणाऱ्या मुलींसाठी त्यांनी वडिलांच्या नावे तुळशीरत्न कन्या ही योजना सुरू केली आहे. कोविड काळात गरजू रुग्णांना मदत व्हावी याकरीता निवेदन दिल्याचे त्यांनी प्रतिक्रिया दिली.