डोंबिवली ( शंकर जाधव ) : गेल्या अनेक महिन्यांपासून डोंबिवलीकरांसाठी चर्चा विषय असलेल्या कोपर पुल अंतिम टप्प्यातले गर्डर डोंबिवलीत दाखल झाले आहे.कोपर पुलाच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर असून औरंगाबाद येथे ज्या ठिकाणी गर्डरची निर्मिती होते,त्या कारखान्यातील काही कामगार दुसऱ्या लाटेतील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संक्रमित झाले होते, काम बंद असल्यामुळे उर्वरित गर्डर येण्यास विलंब झाला गर्डरला जे स्टर्ड (खिळे) बसवतात त्याच्यासाठी वेल्डिंग करावे लागते, आणि या वेल्डिंगला ऑक्सिजनची गरज असते, सध्या सुरू असलेल्या ऑक्सिजन तुटवड्यामुळे या कामात पुन्हा अडथळा निर्माण झाला होता.परंतु येत्या दोन दिवसात दोन गर्डरच्या खिळ्यांचे वेल्डिंग काम पूर्ण होऊन गर्डर लॉन्चिंगचे काम सुरू होणार आहे.गर्डर लॉन्चिंगनंतर त्या गर्डरवर स्टील प्लेट टाकून नंतर स्लॅबचे काम होईल व डांबरीकरण झाल्यावर कोपर पूल लवकरात लवकर सुरु होणार आहे.
कोपर पुलाच्या दोन्ही बाजूच्या जोड रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहे.खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार कोपर पुलाच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी राजेश कदम आणि सागर जेधे यांनी केली.