पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद येरवडा /विश्रांतवाडी, पुणे शाखेचे कोषाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते कवी रमेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद येरवडा /विश्रांतवाडी शाखेच्या वतीने ऑनलाईन निमंत्रित कविंचे कवी संमेलन व रमेश जाधव यांच्यातर्फे स्नेहछाया, पुणे या संस्थेतील उपेक्षित, वंचित मुलांना आर्थिक मदत हा कार्यक्रम आयोजित केला होता.
आपण ज्या समाजात रहातो समाजाच देणं लागतो या भावनेतून रमेश जाधव हे दरवर्षी आपला वाढदिवस अनाथाश्रम,वृद्धाश्रमला आर्थिक मदत,भोजन देवून कवी संमेलन आयोजित करून साजरा करतात. करोना संसर्गामुळे लॉकडाऊन आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी यावर्षी पुण्यातील दिघी येथील स्नेहछाया या भटक्या व अनाथ मुलांच्या संस्थेला संस्थेचे संचालक दत्तात्रय इंगळे यांच्याकडे मदत निधी सुपूर्त केला. संस्थेतील मुलांनीही या ऑनलाईन कवी संमेलनाचा आनंद घेतला.या प्रसंगी लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार दीपक पायगुडे, बाबू वागसकर, ॲड.किशोर शिंदे,नरेंद्र तांबोळी,माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, हेमंत बत्ते, सारंग सराफ, पत्रकार नरेंद्र पारखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. निमंत्रितांचे कविसंमेलनात सिताराम नरके, प्रा. विजय लोंढे,ज्योती हलगेकर जाधव, लक्ष्मीकांत रांजणे, आरुषी दाते,ज्योती कुलकर्णी,मीनाक्षी नागराळे,माया बंगरगी, राहुल भोसले, स्वाती गोरे स्वप्ना अमृतकर, दीपाराणी गोसावी या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कवी, कवयित्रींनी बहारदार कविता सादर केल्या. सर्व सहभागी कवींना सन्मान पत्र देण्यात आले.
कवी रमेश जाधव यांनी सर्व कवी व मान्यवरांचे आभार मानताना लॉकडाऊनमुळे अनेक वृद्धाश्रम, अनाथाश्रमाला मदत मिळणे बंद झाले आहे तरी आपण आपला वाढदिवस त्यांना मदत करून साजरा करावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मसाप विश्रांतवाडी शाखेच्या अध्यक्ष प्रा. रुपाली अवचरे यांनी केले. या ऑनलाईन कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन नवागंध या संस्थेच्या कवयित्री सीमा गांधी यांनी केले.विजय कांबळे,अनुजा रणवरे यांनी या संमेलनास विशेष परिश्रम घेतले.