ठाणे

मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्रात लसीकरण केंद्र सुरू करा – आमदार विश्वनाथ भोईर

कल्याण : मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्रात कोवीड लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात आमदार भोईर यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना एक निवेदन सादर केले असून त्याद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.

कोरोनाला अटकाव करण्यासाठी लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबविणे अत्यंत गरजेचे आहे. शहरात सध्या कार्यरत असणारी लसीकरण केंद्र ही अपुरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही समस्या निर्माण होऊ नये म्हणून वसंत व्हॅली परिसरात असणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी आमदार भोईर यांनी केली आहे. जेणेकरून आसपास मोठ्या संख्येने असणाऱ्या रहिवाशांना लसीकरणासाठी मदत होईल असे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!