ठाणे

सन 𝟐𝟎𝟐𝟏-𝟐𝟐 चा मालमत्ता कर 𝟏𝟓 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 𝟏𝟎 टक्के सवलतनागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन

ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. जे करदाते सन 2021-22 या आर्थ‍िक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर, अशी संपूर्ण कराची रक्कम एकरकमी महापालिकेकडे जमा करतील, अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या देयकातील सामान्य करामध्ये 10 टक्के सवलत देण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेवून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

सन 2021-22 या आर्थिक वर्षाची मालमत्ता देयके वितरीत करण्याचे काम प्रभागसमिती स्तरावरुन सुरू आहे. जे नागरिक 15 जूनपर्यत पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर अशी संपूर्ण कराची रक्कम एकत्रित जमा करतील त्यांना 10 टक्के सवलत, तर 16 जून ते 30 जून 2021 या कालावधीत एकत्रित रक्कम भरल्यास 4 टक्के, 1 जुलै ते 31 जुलै 2021 या कालावधीत एकत्रित रक्कम भरल्यास 3 टक्के तर 1 ते 31 ऑगस्ट 2021 या कालावधीत रक्कम भरल्यास 2 टक्के सवलत देण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या कोणत्याही प्रभागसमिती कार्यक्षेत्रातील करदाते त्यांचा मालमत्ता कर महापालिकेच्या कोणत्याही कर संकलन केंद्रावर रोख, धनादेश, धनाकर्ष तसेच डेबीट कम एटीएम कार्ड, क्रेडीट कार्डद्वारे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.30 ते 4.30 या वेळेत जमा करु शकतील. तसेच महापालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या वेबलिंकद्वारे त्याचप्रमाणे Digithane या ॲपद्वारे देखील करदाते त्यांचा मालमत्ता कर ऑनलाईन पध्दतीने जमा करु शकतात. तसेच महापालिकेतर्फे मोबाईल व्हॅनची अतिरिक्त सुविधा उपलब्ध करुन दिली असून, गृहनिर्माण संस्थेच्या विनंतीच्या अनुषंगाने सदरची व्हॅन संबंधित गृहनिर्माण संस्थेकडून मालमत्ता कर संकलन करणेकरिता उपलब्ध करुन देण्यात येईल असेही महापौर यांनी नमूद केले आहे.

तरी नागरिकांनी या सवलतीचा फायदा घेवून आपला मालमत्ता कर प्राधान्याने भरावा. मागीलवर्षी कोरोनाकाळात देखील नागरिकांनी कर भरणा करुन सहकार्य केले आहे, तसेच यावर्षी देखील सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!