डोंबिवली ( शंकर जाधव ) : कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन डोंबिवली येथील लाला बावटा रिक्षा युनियन तर्फे सॅनीटायझरयुक्त रिक्षा प्रवासी सेवा आजपासून डोंबिवली पूर्व येथील स्थानकाजवळील कॉम्रेड शहीद भगतसिंग रिक्षा स्टँड येथे सुरू करण्यात आली. यावेळी लाल बावटा रिक्षा युनियन अध्यक्ष काळू कोमस्कर, स्टँड प्रमुख महेश आवारे आणि स्टँड वरील प्रमुख रिक्षा चालक उपस्थित होते. यावेळी लाला बावटा युनियनचे अध्यक्ष काळू komskar यांनी रिक्षा चालकांना मिळालेल्या मदती बद्दल बोलताना अद्यापही रिक्षा चालकांना सरकारने जाहीर केलेली मदत मिळाली नसल्याचे सांगत आज पाडून महाराष्ट्रातील अनेक रिक्षा संघटना मालक मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांना मेल द्वारे मदत अद्याप मिळाली नसून लवकरात लवकर मिळावी यासाठी विनंती करणार असल्याचे सांगितले. तसेच कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात राहण्यासाठी हा एक छोटा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अनेक प्रवाशांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले.
लालबावटा रिक्षा युनियन तर्फे सॅनीटायझरयुक्त रिक्षा प्रवासी सेवा
May 6, 2021
276 Views
1 Min Read

-
Share This!