सुधागड, दि. 11 ः सुधागड तालुक्यातील सद्य कोविड परिस्थिती लक्षात घेऊन आपले गाव आपली जबाबदारी मोहिम राबवून श्रीक्षेत्र रामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळ, रामवाडी यांच्या विद्यमाने महाराष्ट्र सरकारने दिलेल्या कोविड19 – ब्रेक द चेन या आदेशसदृश्य आणि हाकेला सक्रीय प्रतिसाद देण्यात आला. या मोहिमेअंतर्गत गावातील प्रत्येक घराचे सॅनीटायजेशन करून ग्रामस्थांना इम्युनिटी अर्थात रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी औषधे, सॅनिटायजर बॉटल्स, वेपोरायजर, ऑक्सिमीटर, सॅनिटायजर फूटस्टँड, मास्क, पी पी ई कीट चे वाटप करण्यात आले.
ठाणे येथील श्रीमती शारदाबाई हौशीलाल मेडिकल फाउंडेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अजीतभाई शाह, सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे चे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांचे सहकार्य व मार्गदर्शन मंडळाला लाभले.
ग्रूप ग्रामपंचायत पाच्छापूर चे सरपंच संजय हुले यांनी या मोहीमेची पाहणी करून मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. मंडळाचे सल्लागार बळीराम निंबाळकर सर, सरचिटणीस गणेश हळदे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष मोरेश्वर हळदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे कार्यकर्ते दिनेश हळदे, मिलिंद हळदे, अमित मालोरे, राकेश हळदे इत्यादींनी विशेष परिश्रम घेतल्याचे मंडळाचे अध्यक्ष राजु सीताराम पातेरे यांनी सांगितले.