डोंबिवली ( शंकर जाधव ) : कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून सार्वजनिक स्तरावर करोना संबधी अंमलबजावणी पार पाडण्याचे कर्तव्य आणि कर्तव्य निभावताना झालेली करोनाची लागण अशा दुहेरी आवाहनास पोलीस कर्मचारी तोंड देत आहेत. पोलीस कर्मचारी जिद्दीने या संकटाचा सामना करित आहेत. या पोलिसांचे आरोग्य सुरक्षित रहावे याकरिता तरुणाई सरसावली आहे. डोंबिवली पूर्व येथील समाज सेवक चैतन्य चंद्रशेखर कदम आणि त्यांची पत्नी अश्विनी कदम यांनी डोंबिवली येथील विविध पोलीस ठाण्यात हर्बल सँनिटायझरची फवारणी करण्याचा अँड.प्रदीप बावस्कर यांच्या सहकार्याने उपक्रम राबविला.सहाय्यक पोलिस आयुक्त यांच्या कार्यालयापासून या उपक्रमास सुरुवात करण्यात आली.
यावेळी डोंबिवली येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयराम शिंदे, रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सचिन सांडभोर उपस्थित होते.पोलीस ठाण्याचा बाहेरील आणि संपूर्ण कार्यालय परिसर तसेच डोंबिवली वाहतूक नियत्रंण कक्ष येथे फवारणी करण्यात आली.यावेळी पोलीस निरिक्षक राजश्री शिंदे उपस्थित होत्या. मानपाडा पोलिस ठाण्यात देखील फवारणी करण्यात आली.
समाजसेवक योगेश माळवी, नयन माळवी, हिम्मत म्हात्रे, सनी सुर्वे यांनी फवारणी उपक्रमास सहाय्य केले.