ठाणे

भाजप माजी नगरसेविका डॉ. सुनिता पाटील यांच्या प्रयत्नाने सागाँव- सागर्ली भागातील पाणी प्रश्न सुटणार

 डोंबिवली ( शंकर जाधव ) : सागाँव- सागर्ली येथील सागावेश्वर मंदिर जवळ २० हजार दशलक्ष पाणी साठवणूक क्षमता असणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.कोरोनाचे संकट पाहता यावेळी मोजक्याच कार्यकर्त्यांनासह हा कार्यक्रम पार पडला.यावेळी भाजप माजी नगरसेविका डॉ.सुनीता पाटील,नामदेव पाटील, सुहासिनी राणे,जनार्दन भोईर,भाऊ ठाकूर, प्रफुल पठारे,ऋषिकेश देशमुख, उमेश भंडारे,वसंत सुखदरे, छाया कांबळे,दिलीप पाटील आदि कार्यकर्ते उपस्थित होते. 

 भविष्यातील पाण्याची टंचाई लक्षात घेता मागील अनेक वर्षांपासून माजी नगरसेविका डॉ.पाटील ह्या महानगरपालिकडे पाठपुरावा करत होत्या. माजी नगरसेविका पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. पुढील वर्षभरात प्रभागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी मार्गी निघेल असे यावेळी डॉ.सुनीता पाटील यांनी यावेळी सांगितले.तसेच अमृत योजना अंतर्गत व कल्याण डोंबिवली(मुंबई महानगर प्रदेश) मध्ये अनेक काम मंजूर करवून घेउन बरीच कामे जलद गतीने होत आहेत. बरीचशी प्रगती पथावर आहेत त्याबद्दल  माजी नगसेविका डॉ. पाटील पालकमंत्री एकनाथजी शिंदे,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि आमदार रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!