ठाणे : आज ठाणे जिल्हाधिकारी श्री राजेश नार्वेकर यांना ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे सल्लागार आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना फ्रन्टलाइन वर्कर म्हणून घोषित करावे व त्यांना त्वरित कोरोना लस देण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
ज्याप्रमाणे आरोग्य सेवक,पोलीस कर्मचारी,सफाई कर्मचारी यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून अग्रक्रमाने लस देण्यात आली त्याचप्रमाणे वृत्तपत्र विक्रेते घरोघरी वृत्तपत्र देण्याचे काम करतात व देशभरातील चाललेल्या घडामोडींची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात तेही कोरोना योध्येच आहेत म्हणून ठाण्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना ही एक वेगळा कॅम्प राबून त्वरित कोरोना लस देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी श्री राजेश नार्वेकर यांच्याकडे केली.
याप्रसंगी आमदार संजय केळकर, संघटनेचे अध्यक्ष दत्ता घाडगे व त्यांचे सहकारी वैभव म्हात्रे व गणेश शेडगे हेही उपस्थित होते.