ठाणे

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नांव द्या : युथ फोरमच्या अ.भा.आगरी महोत्सवाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 डोंबिवली ( शंकर जाधव ) :  नवी मुंबई (पनवेल) येथे निर्माण होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दिनकर बाळु पाटील तथा दि. वा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी आग्रही मागणी आगरी युथ फोरमच्या अखिल भारतीय आगरी महोत्सवकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि महसूलमात्री बाळासाहेब थोरात यांनी यांच्याकडे पत्राद्वारे केल्याची माहिती   आगरी युथ फोरम तसेच अ.भा.आगरी महोत्सव अध्यक्ष गुलाब वझे  यांनी सांगितले.

 महाराष्ट्राच्या राजकारणात दि.बा. या शब्दाला जबरदस्त धार होती. सन १९५२ ते २०१३ अशी आयुष्याची तब्बल 6 वषे अखंड शेतकरी, कष्टकरी, वंचितांच्या न्याय्य हक्कासाठी ते अखंडपणे झगडले. 5 वेळा आमदार, 2 वेळा खासदार पद विधानसभा व विधान परीषदेत विरोधी पक्षनेता पद भुषवुनही सत्तेच्या सर्व प्रलोमनापासुन ते दुर राहिले. आयुष्यभर सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी झिजले. देशात विकास प्रकल्प राबवताना सरकार कवडीमोल भावात मुसंपादन करते. सरकार शेतक-यांच्या भविष्याचा विचार करत नाही. अशा वेळी शेतक-यांच्या प्रकल्पग्रस्तांच्या भविष्याची कळकळ असलेला द्रष्टानेता शेतक-यांच्या व कामगारांच्या भविष्यासाठी दि.बा.यांनी लढा दिली. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त शेतक-यांना १२.५ टक्क्यांचे तत्व शासनाला मान्य करावे लागले. दिबांमुळेच संपुर्ण देशासह महाराष्ट्रात हे तत्व लागु झालेले आहे. या तत्वाचे प्रवर्तक आहेत दि.बा. पाटील. सुदृढ समाज निर्मितीसाठी समाजातील वंचितांसाठी निष्काम वृत्तीने काम करणाऱ्या नेत्याचा आदर्श समाजातील नव्या पिढीसमोर जिवंतपणे उभा ठेवणे, हि काळाची गरज आहे. म्हणुनद नवी मुंबईमध्ये उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते आदरणीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची आग्रही मागणी आम्ही करत आहोत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीबाबत चर्चा सुरू झाल्यापासुन या विमानतळाला लोकनेते आदरणीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत सामाजिक व राजकीय स्तरावर चर्चा सुरू आहे. डिसेंबर २०१२  रोजी पनवेल येथे झालेल्या आगरी समाजाच्या मेळाव्यात देशाचे तत्कालीन कृषीमंत्री शरदचंद्र पवार व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत या विषयावर चर्चा झालेली आहे. तसेच सोळाव्या लोकसभेत आगरी समाजाचे खासदार कपील पाटील यांनी संसदेत यासाठीची मागणीही केलेली आहे. 

स्व. बाळासाहेब ठाकरे हे आगरी समाजासाठी वंदनीय आहेत व पुढेही राहतील. बाळासाहेबांमुळेच युती सरकारच्या मंत्रीमंडळात 3 आगरी बांधवांना कॅबिनेटमंत्री म्हणुन काम करण्याची संधी मिळाली याचे आम्हास स्मरण आहे. स्व. बाळासाहेब हे जसे हिंदुहृदयसम्राट आहेत तसेच ते राष्ट्रीय नेतेही. त्यांचे नाव देशातील कोणत्याही प्रकल्पाला देऊ शकतो व दिलेले आहेत. नवी मुंबई ही ‘दिबांची’ जन्मभुमी व कर्मभुमी आहे. ‘दिबां’चे नाव या विमानतळाला देणे उचित ठरेल असेही मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटल्याचे वझे यांनी सांगितले. तसेच हा भुमिपुत्रांच्या स्वाभिमानाचा व अस्तित्वाचा प्रश्न असल्याने आपण नवी मुंबई, ठाणे, रायगड, मुंबई, पालघर व कोकणच्या भुमिपुत्रांच्या जनमताचा आदर करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिनकर बाळु पाटील तथा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत उचित कारवाई होण्यासाठी सहकार्य असे आगरी युथ फोरम व अ.भा.आगरी महोत्सवचे सचिटणीस रामकृष्ण पाटील यांनीही म्हटले आहे.पांडुरंग म्हात्रे,विश्वनाथ रसाळ,जालिंदर पाटील,शरद पाटील,गुरुनाथ म्हात्रे,प्रकाश भंडारी, अनंता पाटील,भानुदास भोईर व इतर हेही  यासाठी प्रयत्न करत आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!