ठाणे (प्रतिनिधी)- ठाण्यातील पाचपाखाडी येथील एक संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने ठाणे सिव्हील रुग्णालयाला पीपीई किट प्रदान करण्यात आले.
एक संघर्ष मित्र मंडळ, पांचपाखाडी, ठाणे च्या वतीने दरवर्षी अक्षय तृतीयाच्या मुहुर्तावर सार्वजनिक श्री सत्यनारायण पुजेचे आयोजन करण्यात येते. त्या निमित्ताने रक्तदान शिबीर, शालेय वस्तूंचे वाटप, महाप्रसाद भंडारा (अन्नदान) तसेच विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात येतात. परंतु मागील वर्षापासून कोरोनाच्या भीषण परिस्थितीमुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पुजेचे आयोजन न करता त्याप्रसंगी मागिल वर्षी मंडळाच्या वतीने पांचपाखाडी विभागातील गोरगरीब कुटुंबांना मोफत रेशनिंगचे वाटप करण्यात आले. यावेळी देखील अक्षय तृतीया निमित्त पुजेचे आयोजन न करता दिवसरात्र झटणार्या डॉक्टरांसाठी मंडळातील सर्व सभासदांच्या वतीने पीपीई किट प्रदान करण्यात आले.
सिव्हील रुग्णालयाचे सह सिव्हिल सर्जन डॉ. कांबळे, डॉ. विलास साळवे, रुग्णालयातील सामाजिक अधिकारी शिद यांच्याकडे हे पीपीई किट , मंडळाचे अध्यक्ष कल्पेश चंद्रकांत मिठबावकर, दुशांत दिलीप पाटील, मंगेश लोटन देवरे यांनी सुपूर्द केले.