ठाणे

ठाणे शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार

ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने जांभूळ (बारवी) जलशुध्दीकरण येथील जलवाहिन्यांची तातडीची देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतल्यामुळे गुरुवार दिनांक २० मे २०२१ रोजी रात्री १२.०० ते शुक्रवार दिनांक २१ मे २०२१ रोजी रात्री १२.०० पर्यंत २४ तास शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामध्ये कळवा , खारेगाव , पारसिक नगर, आतकोनेश्वरनगर , घोलाई नगर , रेतीबंदर , विटावा, मुंब्रा, दिवा, शीळ, कौसा, डायघर, देसाई, इंदिरानगर , रुपादेवीपाडा , वागळे फायर ब्रिगेड तसेच बाळकुम पाडा नं .१ या ठिकाणी एमआयडीसीकडून होणारा पाणी पुरवठा २४ तास पुर्णपणे बंद राहणार आहे.

वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!