महाराष्ट्र

हिमालयपुत्र सुंदरलाल बहुगुणा हे पर्यावरण योद्धा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. 21:- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी प्रसिद्ध पर्यावरणवादी व चिपको आंदोलनाचे प्रणेते पद्मविभूषण सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

श्री सुंदरलाल बहुगुणा हे हिमालय पर्वतशृंखला तसेच पर्यावरण संरक्षण व संवर्धन कार्यास समर्पित असे ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते. स्वातंत्र्यसैनिक असलेल्या बहुगुणा यांनी जीवनात महात्मा गांधी यांचे तत्वज्ञान अंगीकारत सत्याग्रहाचा अवलंब केला. त्यांनी व्यसनमुक्ती कार्यात पर्वतीय महिलांना संघटित केले. त्यांनी चिपको या ऐतिहासिक आंदोलनाचे नेतृत्व केले तसेच प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासाठी कार्य केले. श्री सुंदरलाल बहुगुणा यांचा आणि माझा घनिष्ठ परिचय होता हे माझे भाग्य समजतो. त्यांच्या निधनामुळे आपण पर्यावरण रक्षणासाठी समर्पित लढवय्या योद्धा गमावला आहे. हिमालयपुत्र दिवंगत श्री बहुगुणा यांच्या आत्म्यास प्रभूचरणांजवळ स्थान मिळो ही प्रार्थना करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना तसेच त्यांच्या असंख्य चाहत्यांना कळवतो असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!