ठाणे

डोंबिवली पश्चिमेकडील खाडीकिनारी फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी

डोंबिवली ( शंकर जाधव ) : लॉकडाऊन आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत पालिका प्रशासनाने लावलेले  निर्बंध यामुळे कोरोना बांधीतांची संख्या आटोक्यात आली आहे.मात्र काही नागरिक कोरोना काळात नियमाचे उल्लंघन करून बिनदास्तपणे डोंबिवली पश्चिमेकडील रेती बंदर रोडवरील मोठा गाव खाडी किनारी फिरण्यासाठी जात असतात.पालिकेचे`ह`प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते, पथकप्रमुख विजय भोईर विष्णूनगर पोलिस यांनी सदर ठिकाणी करवाई करत कोरोनाचे नियम मोडणाऱ्या ४० ते ५० नागरिकांची कोरोना चाचणी केली. कोरोनाच्या संकटात नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे.

मात्र काही नागरीक आपल्या बरोबर इतरांची जीव धोक्यात घालत असल्याची जाणीव त्यांना नसते. अश्या वेळी अश्या नागरिकांवर कारवाईची बडगा उगारल्यावर यावर नियंत्रण मिळते.कोरोनाच्या महामारीला आपल्या शहरातून, जिल्ह्यातून, राज्यातून आणि देशातून हरविण्यासाठी नागरिकांनी राज्य सरकार व प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे.सरकारने जे निर्बंध लागू केले आहे ते सर्वसामान्य नागरिकांसाठी आहेत असे पथकप्रमुख विजय भोईर यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!