ठाणे : ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून जयजीत सिंग यांनी अखेर आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. गेले काही दिवस जयजीत सिंग यांची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्याची चर्चा होती. पण त्यांनी कार्यभार स्वीकारला नव्हता. मात्र आज दुपारी त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात येऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. प्रथेनुसार त्यांना पोलीस आयुक्त कार्यालयात मानवंदना देण्यात आली.
ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते दहशतवाद विरोधी पथकाचे अपर पोलीस महासंचालक या पदावर कार्यरत होते.