कल्याण :- गुणेश डोईफोडे शिक्षण क्षेत्रातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. गुणेश नावाने सर्वांचे परिचित. गणेश विद्या मंदिर कल्याण पूर्व येथे प्राथमिक शिक्षक म्हणूनकार्यरत …परंतु आपल्या कामाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांशी दांडगा संपर्क होता. सतत कामात धडपड आणि व्यस्त क्रीडा क्षेत्रात तर फार झोकून दिलं होतं. लेखनाची आवड शिक्षण क्षेत्रात काहीतरी नाविन्य आणायचं सतत प्रयत्नशील.विविध वृत्तपत्रांमध्ये शैक्षणिक लिखाण करून त्यांनी कल्याण-डोंबिवली मध्ये एक आपला वेगळा ठसा उमटवला होता. गुणेश हे नेहमीप्रमाणे आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी वॉकिंग ला बाहेर पडले चालत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले.