कल्याण : कल्याण जवळील मलंगपट्यातील व्दारली या गावात राहणारा गजानन चिकणकर, हा स्वतःला हभप महाराज समजतो, याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. गाव व परिसरात भजन किर्तन असले की हा बुवा तेथे भक्तांना ज्ञानाच्या गोष्टी सांगत. पण हाच “बुवा” एका वयोवृद्ध महिलेस लाथाबुक्क्यां नी प्लास्टिक च्या बादलीने अमानुष मारहाण करतानाचा विडिओ सोशलमिडीयावर व्हायरल झाला.या विडिओ ची सत्त्यता पडताळणीसाठी गावातून माहिती घेतली असता या चालबाज बुवांची कुकृत्ये समोर आली.गजानन चिकणकर या बुवाच्या २ बायका, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार, मुलगा पकवाज वाजवतो व हा किर्तन करतो. पहिल्या बायकोचे वय जास्त झाल्याने तिला घरातील कामे होत नाहीत. त्यामुळे तो हिला अमानुष मारहाण करित असे, घरातील सुना, नातवंडे, यांना देखील शिवीगाळ व मारहाण करत होता. हे रोजचेच झाल्याने शेजारी देखील वैतागून गेले होते. हा मारहाणीचा विडिओ त्याच्या नातवाने शुट करून व्हायरल केला आहे.
यामध्ये अगदी लाथाबुक्क्यां, पाण्याची प्लास्टिकची बादलीने अमानुष मारहाण करताना दिसत आहे. हे करताना आपल्या गळ्यात तुळशीची माळ आहे हे देखील तो बुवा विसरला आहे. हा विडिओ व्हायरल होताच पोलीस यांच्या घरी गेले होते. मात्र या बहाद्दराने केलेले पाप धुण्यासाठी केंव्हाच आळंदी गाठली.हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चिकणकर बुवा काही दिवसांसाठी बाहेरगावी गेल्याचं सांगितलं गेलं. तसेच, त्यांच्या पत्नीनेही कोणतीच तक्रार दाखल केली नसल्याने पोलिसांना कारवाई करता येत नसल्याचे चित्र होते. सुरूवातीला पोलिस चिकणकर बुवांना केवळ समज देणार असल्याची माहिती होती पण अखेर सामाजिक दबाव पाहता पोलिसांनी बुवांवर कलम 323, 324, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळाली,हिललाईन पोलिसांनी आरोपी विरोधात सु मोटोने गुन्हा दाखल केला व अटक केली.