डोंबिवली ( शंकर जाधव ) : भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत डोंबिवली ग्रामीण मंडळ कार्यालयात अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर मोबाईल अॅपचे प्रशिक्षण देण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी, डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब, महिला ग्रामीण मंडळ महिला अध्यक्षा सुहासिनी राणे,माजी नगरसेविका डॉ.सुनीता राणे,उपाध्यक्षा रेश्मा पंडित,सचिव गंगा चंद,कोषाध्यक्ष बेबी पाटील,उपाध्यक्षा रसिका पाटील, माजी नगरसेवक जालिंदर पाटील,राजश्री पाजंणकर,संतोष शुक्ला, कर्ण जाधव आदि उपस्थित होते.या प्रशिक्षणात डोंबिवली ग्रामीण मधील २०४ अंगणवाडी सेविकांनी सहभाग घेतला होता.
रविंद्र चव्हाण म्हणाले, मोडी सरकारमुळे २४३ योजना जनतेसाठी सुरु असून भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता या योजनाची माहिती जनतेपर्यत पोहोचवण्याचे काम करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी लक्षात घेतली पाहिजे. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे देशातील प्रत्येक जण तंत्रज्ञानाशी जोडला गेला प्रत्येक माणूस तंत्रज्ञानाशी जोडला जाणे म्हणजेच मुख्य प्रवाहात येणे असा त्यांचा अर्थ होतो.प्रत्येक व्यक्तीचे जनधन योजना खाते असले पाहिजे. आधारकार्ड ची नोंदणी असली पाहिजे. आणि मोबाईलशी ती व्यक्ती जोडला गेला पाहिजे. तर येत्या काळात हा देश तंत्रज्ञानाशी जोडला जाईल. त्यांचे एक पाऊल म्हणजे आज या भागातील सर्व नगरसेवक, मनिषा राणे आणि कार्यकत्र्यानी अंगणवाडी सेविकांर्पयत हे काम नेले आहे असे सांगितले. अंगणवाडी सेविका यांनी सांगितले, या अॅपमुळे रजिस्टरचे काम ७० ते ८० टक्के कमी झाले आहे. ऑनलाईन काम झाल्यामुळे जास्तीत जास्त सेवा करू शकतो. आमचा अधिक वेळ हा रजिस्टर भरण्यात जात होता.आता तो वेळ वाचणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. याबाबत सुहासिनी राणे म्हणाल्या, केंद्र शासनाच्या पोषण अभियान या कार्यक्रमांतर्गत पोषण ट्रॅकर मोबाईल अॅप पोषण अभियान राबविण्यात येत आहे. हे पोषण ट्रॅकर अॅप हाताळण्याकरिता आवश्यक असणारे प्रशिक्षण डोंबिवली ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांना भाजपा महिला आघाडीच्या वतीने देण्यात येत आहे. या पोषण ट्रॅकर अॅपमुळे अंगणवाडी सेविकांच्या कामाचा ताण हलका होणार असून कामात पारदर्शीपणा ही दिसून येणार आहे.