नवी मुंबई

माहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती

नवी मुंबई, दि. 9:- सचिव तथा माहिती व जनसंपर्कचे महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज कोंकण विभागीय माहिती कार्यालयाला भेट दिली. तसेच कोकण विभागात होणाऱ्या मुसळधार पावसाचा आढावा घेतला. विभागीय कोकण आयुक्त श्री.अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडूनही माहिती घेतली. 

          कोकण विभागात दोन दिवसाआधी पावसाचे आगमन झाले आहे.  ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्हयात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दि. 10 व 11 जूनला रायगड, पालघर व ठाणे जिल्हयात अतिवृष्टीचे संकेत हवामान खात्याने दिलेले आहे.  आपातकालीन परिस्थितीची अचूक माहिती बातम्यांच्या स्वरुपात व इतर समाज माध्यमांव्दारे जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम विभागीय माहिती कार्यालय व त्यांच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा माहिती कार्यालयांमार्फत चोखपणे पार पाडले जाते.  संभाव्य अतिवृष्टीच्या काळात बातम्यांच्या प्रसिध्दी विषयक कामांचे नियोजन व कोकण विभागात होणाऱ्या पावसाचा आढावा घेण्यासाठी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी विभागीय माहिती कार्यालयास अचानक भेट दिली.  

          यावेळी डॉ. पांढरपट्टे यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. कोरोना काळात प्रसिध्दीच्या कामात खंड न पडू देता काम केल्या बद्दल कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.  तसेच येणाऱ्या काळातही कर्मचाऱ्यांकडून अश्याच कौतुकास्पद कामाची अपेक्षा व्यक्त केली. सोबतच कुटुंब प्रमुखाप्रमाणे पावसाळ्यात सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या आरोग्याची काळजी घ्यावी व सुरक्षित राहावे अशा सुचनाही दिल्या.

             यावेळी कोकण विभागाचे उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी कोकण विभागाच्या कामकाजाचा अहवाल डॉ. पांढरपट्टे यांच्या समोर मांडला.  

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!