मुंबई

⭕️ब्रेकिंग : मुंबईतील मालाडमध्ये चार मजली चाळीचा काही भाग कोसळून दुर्घटना ; 11 जण ठार तर 17 जण गंभीर.

मुंबई, 10 जून: मुंबईत मुसळधार पावसामुळे मालाडमधील एका चार मजली चाळीचा काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. मालाडच्या मालवणी भागात ही घटना घडली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी झालेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

न्यू कलेक्टर कंपाऊंटमधील चार इमारतीचा काही भाग कोसळला. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुर्देवानं मृतांमध्ये 6 लहांना मुलांचा समावेश असून या लहानग्यांचं वय 10 वर्षाच्या आत आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महापालिकेसह इतर प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य अद्यापही सुरु आहे. सध्या या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. काही जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आलं असून काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!