ठाणे

नागरिकांच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना आमदार प्रमोद ( राजू) पाटील यांनी सुनावले..

   डोंबिवली ( शंकर जाधव ) : मुसळधार पावसामुळे पुन्हा नांदीवली स्वामी समर्थ मठाजवळील परीसरात कमरेपर्यंत पाणी साचले होते त्यासाठी पालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना मनसे आमदार प्रमोद ( राजू )  पाटील यांनी सदर ठिकाणी पाहणी करून  घटनास्थळी बोलावले.अधिकारी वर्गाकडून नेहमीची थातुरमातुर उत्तरे मिळाल्यानंतर आमदार पाटील यांनी सर्व नागरीकांसमोर अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले.नालेसफाईचा बोजवारा उडाल्याचे  आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना संगीतले.तसेच यावर  तात्काळ उपाययोजना करण्यास सांगितले.

आमदार पाटील यांनी निधीतून तात्पुरत्या स्वरूपातील कामांसाठी निधी दिला आणि कायमस्वरुपी नाले बांधण्यासाठी तब्बल १ कोटीचा निधी वर्ग करणार असल्याचे  सांगितले.आपल्या समस्येकडे लक्ष दिल्याबद्दल परीसरातील नागरीकांनी आमदार पाटील यांचे  आभार मानले.

सदर पाहणी दौर्यात मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष तथा  माजी नगरसेवक मनोज घरत,हर्षद पाटील महापालिकेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदिश कोरे,किरण वाघमारे,ड्रेनेज विभागाचे माधगुंडी,लीलाधर नारखेडे,प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पवार व परिसरातील नागरीक उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!