ठाणे :- ठाण्यातील व्हिव्ही्याना मॉल येथील स्पा मध्ये ब्युटीशियन चे काम करणाऱ्या व मुळच्या मणिपूर मिजोराम येथील व सध्या सांताक्रुज, कलिना येथे राहणाऱ्या दोन महिला १.कन्मिला आ्रांगसू रायसिंग वय २७ राहणार ग्रीन हाऊस चाळ,कलीना मुंबई,२. लालगुरसांगी चेचोमा फॅन्चुन वय ३० राहणार ब्रेन फर्नांडिस हाऊस कलिना व्हिलेज सांताक्रुज मुबंई या दिनांक ९/६/२०२१ रोजी आपले स्पा मधील काम संपवून संध्याकाळी ७:५० च्या दरम्यान व्हिव्ही्याना मॉल समोर उभ्या असलेल्या ऑटो रिक्षाने सांताक्रुजला जाण्यासाठी निघाल्या रिक्षा तिन हाथ नाक्याच्या परिसरात आल्यानंतर, पल्सर मोटारसायकल वरून आलेल्या युवकांनी रिक्शातून जाणाऱ्या कन्मिला चा मोबाईल खेचला त्या वेळी कन्मिला धावत्या ऑटो रिक्षा मधून बाहेर पडली, बाहेर पडल्यामुळे तिच्या डोक्याला मार बसला स्थानिकांच्या मदतीने तिला हॉस्पिटल मध्ये नेले असता डोक्याला गंभीर मार लागल्या मुळे तिचा मृत्यू झाला, तिच्या बरोबर असणाऱ्या लालगुरसंगी हिच्या फिर्यादीवरून नौपाडा पोलीस स्टेशन मध्ये ३९२,३०४,३४ प्रमाणे १०/६/२०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, पोलीस सहाय्यक आयुक्त निता पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले, पोलीस निरीक्षक( गुन्हे) रविंद्र क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे, दिनेश चव्हाण, सचिन बाराते व त्यांच्या टीम ने मिळालेल्या वेगवेगळ्या माहिती व पुराव्यावरून २४ तासाच्या आत कन्मिला हिचा मोबाईल चोरणाऱ्या व तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या दोन आरोपींना अटक केली यातील एक आरोपीचे नाव अल्केश परवेज मोमीन अन्सारी वय २० असून तो कुशाल अपार्टमेंट भिवंडी येथे राहण्यास आहे, तर दुसरा आरोपी सोहेल रमजान अन्सारी वय 18 वर्ष, क्वार्टर गेट मस्जिद जवळ, भिवंडी जिल्हा ठाणे येथे राहण्यास आहे, हे दोघेही जेमतेम शिकलेले काहीही कामधंदा न करणारे भामटे इसम आहेत. या दोघांवर कोनगाव पोलीस स्टेशन व नारपोली पोलीस स्टेशन येथे मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
नौपाडा पोलिसांनी २४ तासाच्या आत या दोन आरोपींना अटक केल्या बद्दल पोलीस आयुक्त यांनी या पथकाला पंचवीस हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच या प्रकारचे गुन्हे घडूनये म्हणून परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे.