ठाणे दि.14 :महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्पाद्वारे जागतिक पर्यावरण दिना निमित्त आज ठाणे जिल्हा मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आले. जागे अभावी वृक्ष भेट स्वरुपात देण्यात आले.
यावेळी बार्टी अंतर्गत समतादूत प्रकल्पातील जिल्हा प्रकल्प अधिकारी श्रीमती मेघा पवार व समतादूत सविता औटी, वृषाल केंजळे, जालिंदर जगताप उपस्थित होते.
वृक्षारोपण पंधरवाडा हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र मध्ये दिनांक 05 जून ते 20 जून 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
कोविड – १९ शासन सर्व नियम पाळून कार्यक्रम घेण्यात आला. कोविड १९चा वाढता प्रादुर्भावामुळे प्राणवायूची जाणवत असलेली कमतरत्ता तसेच वाढते प्रदुषण पाहता पर्यावरणाचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे संपूर्ण राज्यात समतादूतांमार्फत कडूलिंब, चिंच, वड, पिंपळ अश्या मोठ्या प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात येत आहे.
पंधरवाड्यात महाराष्ट्रात एकूण 50 हजार झाडे लावण्याचा बार्टी चा मानस आहे. समतादूतांमार्फत आतापर्यंत ठाणे जिल्हामध्ये जवळपास 152 वृक्षारोपण करण्यात आले आहे. दिनांक 20 जून 2021 पर्यंत समतादूतांमार्फत जिल्हा मध्ये 400 ते 500 वृक्षारोपण करण्याचा जिल्हा प्रकल्प अधिकारी यांनी सांगितले. हा कार्यक्रम बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी श्रीमती मेघा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजन सुरु आहे.