घाटकोपर : शिवसेनेचे झुंजार कामगार नेते,भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष कमांडर कै. दत्ताजी साळवी यांच्या १०३ व्या जयंती निमित्त घाटकोपर पूर्व च्या पंतनगर विभागातील कै. दत्ताजी साळवी चौकात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
माजी पोलीस अधिकारी निर्मल साहेबांच्या हस्ते साळवीं च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी उपविभागप्रमुख चंद्रपाल चंदेलिया,संजय दरेकर,शाखाप्रमुख अजित गुजर,मयुरेश नामदास,सह संघटक नरेश माटे,उपविभागप्रमुख,प्रकाश वाणी,चित्रपट सेनेचे भुषण चव्हाण,सचिन भांगे आदी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.