डोंबिवली ( शंकर जाधव ) : शिवसेनेच्या माजी नगरसेविका मधुमती शिसोदे यांचे गुरुवारी सकाळी अल्पशा आजाराने खाजगी रुग्णालयात निधन झाले .त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.
डोंबिवली जिमखाना प्रभागातून २००५ साली शिसोदे निवडून आल्या होत्या. त्यानंतर महिला बाल कल्याण समितीच्या सभापतीम्हणून काम पहिले होते त्यांच्या पार्थिवावर डोंबिवली दत्तनगर शिवमंदिर स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात आले.