ठाणे / दिवा, ( संतोष पडवळ) : गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारीमुळे व आर्थिक गणितं बिघडल्यामुळे सर्व पालक चिंतेत आहेत. दिव्यातील गणपत वारेकर विद्यालयाने त्यात चालू आर्थिक वर्षांपासून शालेय फी दरवाढ केल्याने आज संतप्त पालक व समाजसेवक अमोल केंद्रे यांनी वारेकर शाळेच्या संस्थाचालकांस वाढीव फी दरवाढ व कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी निवेदन देण्यात आले.
प्रसंगी ऐक वर्षांपासून अधिक काळ शाळा बंद असून फक्त ऑनलाईन शिक्षण सुरु असून विद्यार्थी शालेय सुविधा वापरत नसल्याने व शाळा चालवनेचा खर्च देखील कमी झाल्याने शालेय शालेय संस्थांनी याचा विचार करून स्वतः संवेदनशिलता दाखवून व कोणताही विद्यार्थी शालेय प्रवेश व शिक्षणापासून वंचित न राहण्यासाठी फी दरवाढ करू नये असे निवेदन संस्थेच्या विजया वारेकर देण्यात आले.
वाढीव शालेय फी कमी करून देण्याचे सकारात्मक आश्वासन दिल्याने संस्थेच्या विजया वारेकर यांचे समाजसेवक अमोल केंद्रे, संतोष पडवळ, प्रवीण निकम, राहुल जगताप तसेच इतर पालकांनी याचे आभार व्यक्त केले.