ठाणे

८ जुलैला ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन

डोंबिवली ( शंकर जाधव ) : ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून त्यांना कुठल्याही स्वरूपाचा मोबदला न देता दमदाटी करून एका नामांकित विकासकाने फसवणूक केली आहे.या बांधकाम व्यवसायाच्या विरोधात हजारो शेतकरी आंदोलनच्या पवित्र्यात आहेत.शेतकऱ्यांवर झालेला अन्यायावर पीपल्स रिपब्लिकन पार्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे  दाद मागितली आहे. तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टी हजारो शेतकऱ्यांसह सदर विकासकाच्या विरोधात त्याच्या निवासस्थानसमोर ८ जुलै रोजी आत्मदहनाचा इशारा राष्ट्रीय अध्यक्ष विजयदीप कवाडे यांनी शेतकरी बचाव समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत दिला.

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष कवाडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी समितीचे अध्यक्ष बबन तेमटे, उपाध्यक्ष रामदास काळण,संतोष फराड,सावन पाटील, मोहन ठाकरे, मोहन फुलोरे, ज्योती पाटील, यशवंत जाधव, डोलवार पाटील, संतोष गोंधळी, महेंद्र पाटील, सुदाम म्हात्रे, शिवदास पाटील, हरीश्चंद मांगरूळकर,रायदास चौधरी आदी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष कवाडे म्हणाले, दिल्लीतील शेतकऱ्यांचा मोर्चा कोरोनामुळे संथ झाला असला तरी तो अजून सुरूच आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन हे न्याय मिळाल्यावरच थांबेल.समितीचे अध्यक्ष तेमटे यांनी पोलीस शेतकऱ्यांवरच तक्रारी दाखल करत असून हा कुठला कायदा असा प्रश्न निर्माण केला.सदर विकासच्या विरोधात इडीची चौकशी लावावी अशी मागणी पत्रकार परिषदेत उपस्थित शेतकऱ्यांनी केली.शेतकऱ्यांच्या जमिनी दुसऱ्यांच्या नावावर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली.  

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!