ठाणे

डोंबिवली शिवसेना शाखेतर्फे ५० अंध व्यक्तींना लसीकरण आणि रेशन किटची मदत

डोंबिवली ( शंकर जाधव) : रोटरी क्लब ऑफ सनसिटी आणि शिवसेना यांच्या संयुक्त विधमाने लसीकरण अंधांची व लसीकरण सगळ्यांची या वाक्यद्वारे आज सकाळी ५० अंध व्यक्तींना लसीकरण करून रेशनिंग किट दिले.

डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर शिवमंदिर येथील ज्ञानेश्वर हिंदी हायस्कुलच्या लसीकरण केंद्रात  वांगणी ,कर्जत, कल्याण,बदलापूर, व डोंबिवली येथील अंध व अपंग ५० ते ६० व्यक्तींना लसीकरण करण्यात आले.रोटरी क्लब सनसिटी डोंबिवली आणि डोंबिवली शहर शाखे मार्फत अंधा – अपंगांना विशेष लसीकरण शिबिर ठेवण्यात आले होते.  राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत समाजाच्या सर्व स्तरातील व्यक्तीला लस मिळायलाच हवी ह्याच उद्देशाने ही लसीकरण मोहीम घेण्यात आली.शिवसेना नेहमी समाजकार्य करते असते, त्याचाच एक भाग म्हणून अंध-अपंगांसाठी कोणतीही रांगा व गर्दी न करता त्यांच्यासाठी एका खोलीत विशेष व्यवस्था करून त्यांचे लसीकरण करून घेतल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह  महापालिका वैधकीय अधिकारी डॉ. अदवरयु गौडकर , उपअभियंता रोहिणी लोकरे,रोटरीचे निशांत व्यास,लक्ष्मी शर्मा,  आदी उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!