मुंबई

एसजीईआय व एचएसएससी सहयोगाने एण्‍डोस्‍कोपी क्षेत्रातील जीआय टेक्निशियन्‍सची कौशल्‍ये अधिक निपुण करणार

जीईटीटी हा गॅस्‍ट्रोइन्‍टेस्टिनल एण्‍डोस्‍कोपी टेक्निशियन्‍ससाठी भारताचा पहिला ऑन दि जॉब ट्रेनिंग कोर्स

मुंबई, २९ जून २०२१: सोसायटी ऑफ गॅस्‍ट्रोइन्‍टेस्टिनल एण्‍डोस्‍कोपी ऑफ इंडियाने (एसजीईआय) आज एण्‍डोस्‍कोपी क्षेत्रातील जीआय टेक्निशियन्‍सची कौशल्‍ये अधिक निपुण करण्‍यासाठी हेल्‍थकेअर सेक्‍टर स्किल कौन्सिलसोबत (एचएसएससी) सामंजस्‍य करारावर (एमओए) स्‍वाक्षरी केली. गॅस्‍ट्रोइन्‍टेस्टिनल एण्‍डोस्‍कोपी टेक्निशियन टेक्निशियन ट्रेनिंग (जीईटीटी) हा जीआय टेक्निशियन्‍ससाठी भारताचा पहिला ऑन दि जॉब ट्रेनिंग कोर्स आहे. या सामंजस्‍य कराराचा भाग म्‍हणून एसजीईआय प्रमाणपत्र कोर्सच्‍या माध्‍यमातून सहभागींना प्रशिक्षण देण्‍यासोबत त्‍यांची कौशल्‍ये अधिक निपुण करेल आणि देशासाठी कुशल एण्‍डोस्‍कोपी टेक्निशियन्‍सचा समूह निर्माण करेल. या अपस्किलिंग उपक्रमाला उद्योगक्षेत्रातील आघाडीच्‍या कंपन्‍या – बोस्‍टन सायण्टिफिक इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेड आणि ऑलिम्‍पस मेडिकल सिस्टिम्‍स यांचे पाठबळ आहे.

गॅस्‍ट्रोइन्‍टेरोलॉजी (जीआय) टेक्निशियन्‍स किंवा जीआय एण्‍डोस्‍कोपी टेक्निशियन्‍स म्‍हणून ओळखले जाणारे एण्‍डोस्‍कोपी टेक्निशियन्‍स प्रामुख्‍याने डॉक्‍टरांना विविध एण्‍डोस्‍कोपिक प्रक्रियांमध्‍ये साह्य करतात. हा अपस्किलिंग उपक्रम ऑन-दि-जॉब स्किल एन्‍हासमेण्‍ट प्रोग्राम आहे. जीईटीटी हा सुप्रसिद्ध प्रशिक्षण कोर्स आहे आणि एसजीईआय व वर्ल्‍ड एण्‍डोस्‍कोपी ऑर्गनायझेशन (डब्‍ल्‍यूईओ) यांनी या कोर्सला यापूर्वीच प्रमाणित केले आहे. कोर्स तात्‍पुरत्‍या कालावधीसाठीचा असून त्‍यामध्‍ये ४ मॉड्यूल्‍स आहेत. ४ मॉड्यूल्‍समध्ये सरासरी ७२ तासांच्‍या प्रशिक्षणाचा समावेश असेल. कोर्सदरम्‍यान सहभागींना उपदेशात्‍मक व्‍याख्‍याने, स्‍वयं-वाचन सामग्री मिळण्‍यासोबत ते प्रामुख्‍याने सलंग्‍न असलेल्‍या केंद्रांमधील प्रक्रियांमध्‍ये साह्य करण्‍याची आणि डॉक्‍टर्स व वरिष्‍ठ एण्‍डोस्‍कोपी टेक्निशियन सहका-यांकडून शिकण्‍याची संधी मिळेल. तसेच सहभागींना विविध उद्योग-केंद्रित नवोन्‍मेष्‍कारांची ओळख करून देण्‍यात येईल आणि क्षेत्रातील उद्योगप्रमुखांकडून उपयुक्त माहिती मिळेल.

सहभागींना उद्योगक्षेत्रामध्‍ये उपलब्‍ध असलेले अत्‍याधुनिक तंत्रज्ञान व उपकरणाशी परिचित हेाण्‍याची देखील संधी मिळेल. जीईटीटीचे पहिले पर्व दिल्‍ली, हैद्राबाद, बेंगळुरू, कोची, चेन्‍नई व कोलकाता या सहा प्रमुख शहरांमध्‍ये आयोजित करण्‍यात आले. देशातील सहा इतर शहरांमध्‍ये देखील आगामी पर्व राबवण्‍यात येणार आहे. ही नवीन शहरे आहेत- मुंबई, पुणे, अहमदाबाद, जयपूर, लखनौ व विशाखापटणम.

या घोषणेबाबत बोलताना एसजीईआयचे माननीय सचिव डॉ. सुंदीप लखतकीया म्‍हणाले, ”आम्‍हाला एचएसएससीसोबत हा सहयोग करण्‍याचा अत्‍यंत अभिमान वाटत आहे आणि आम्‍ही या प्रोग्रामच्‍या महत्त्वाला जाणून घेण्‍यासाठी अधिका-यांचे आभार मानतो. या प्रोग्राममध्‍ये नोंदणी केलेल्‍या सहभागींना विविध जीआय एण्‍डोस्‍कोपिक प्रक्रियांमध्‍ये साह्य करण्‍याच्‍या पद्धती शिकवण्‍यात येतील. त्‍यांना प्रक्रियेदरम्‍यान रूग्‍णांची देखरेख आणि प्रक्रियेनंतर त्‍यांची काळजी घेण्‍याबाबत देखील शिकवण्‍यात येईल. प्रशिक्षणामध्‍ये एण्‍डोस्‍कोप्‍स व इमेज अॅक्विजिशनची कार्यपद्धती, साफसफाईचे महत्त्व, वैद्यकीय साहित्‍य व उपकरणांचे निर्जंतुकीकरण आणि संसर्ग नियंत्रण तत्त्वं यांचा समावेश असेल. या प्रोग्राममधील इतर विषयांमध्‍ये वैद्यकीय शब्दावली, मुलभूत रचना, काही एन्डोस्कोपी उपकरणे आणि प्रक्रिया केल्‍या जाणा-या भागांचे निर्जंतुकीकरण यांचा समावेश आहे. इच्‍छुक उमेदवार आमच्‍या वेबसाइटवरून कोर्स व अर्ज प्रक्रियेबाबत माहिती मिळवू शकतात.”

”भारतामध्‍ये कुशल मनुष्‍यबळाची गरज वाढत आहे आणि विशेषत: आरोग्‍यसेवा विभागामध्‍ये कुशल मनुष्‍यबळाच्‍या मागणी-पुरवठामधील पोकळी कमी होत आहे. यासारखे जागतिक दर्जाचे अपस्किलिंग प्रोग्राम्‍स वाढत्‍या अर्थव्‍यवस्‍थेसाठी आवश्‍यक असलेली कौशल्‍ये बिंबवण्‍यामधील आव्‍हानांना दूर करतील. आमचा विश्‍वास आहे की, या उपक्रमाचा देशाच्‍या आरोग्‍यसेवा विभागासोबत तरूणांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल,” असे एचएसएससीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. आशिष जैन म्‍हणाले.

बोस्‍टन सायण्टिफिकेचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. मनोज माधवन म्‍हणाले, ”आम्‍हाला या अपस्किलिंग उपक्रमामध्‍ये एसजीईआय व एचएसएससीसोबत सहयोग करण्‍यासोबत त्‍यांना पाठिंबा देण्‍याचा खूप आनंद होत आहे. कुशल मनुष्‍यबळ निर्माण करण्‍यासाठी हा अत्‍यंत उत्तम उपक्रम आहे, ज्‍यामुळे भारताच्‍या गॅस्‍ट्रोइन्‍टरोलॉजी क्षेत्राच्‍या उत्तम वैद्यकीय परिणाम निर्माण करण्‍याप्रतीच्‍या क्रांतीमध्‍ये साह्य होऊ शकेल. एचएसएससीकडून मान्‍यता हा मोठा मैलाचा दगड आहे आणि यामुळे सर्व भागीदारांना या थोर व महत्त्वपूर्ण उपक्रमाला अधिक पुढे घेऊन जाण्‍यास प्रोत्‍साहन मिळते. आम्‍हाला या सहयोगाच्‍या माध्‍यमातून या प्रवासाचा भाग होण्‍याचा आनंद होत आहे. बोस्‍टन सायण्टिफिकमध्‍ये आम्‍ही जगभरातील रूग्‍णांच्‍या आरोग्‍यामध्‍ये सुधारणा करणा-या नवोन्‍मेष्‍कारी वैद्यकीय सोल्‍यूशन्‍सच्‍या माध्‍यमातून आमूलाग्र बदल घडवून आणण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.” 
 

भारतामध्‍ये सध्‍या ३००० गॅस्‍ट्रोइन्‍टेरोलॉजिस्‍ट्स आहेत. दरवर्षी जवळपास १५० नवीन गॅस्‍ट्रोइन्‍स्‍टेरोलॉजिस्‍ट्स (डीएम व डीएनबी पदवीधर) आणि हेप्‍टॅटोलॉजी पदवीधर त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रॅक्टिसला सुरूवात करतात. भारतातील गॅस्‍ट्रोइन्‍टेरोलॉजी व लेप्‍टोलॉजी डॉक्‍टरांच्‍या वाढत्‍या समूहासह एण्‍डोस्‍कोपी टे‍क्निशियन्‍ससाठी रोजगार संधी आहे. देशामध्‍ये सध्‍या ६००० हून अधिक एण्‍डोस्‍कोपी केंद्रे आहेत. प्रतिष्ठित क्लिनिक्‍स व हॉस्पिटल्‍स प्रक्रियांची आकडेवारी व जटिलता वाढत असताना एण्‍डोस्‍कोपी टेक्निशियन्‍सना नियुक्‍त करणे सुरूच ठेवतील.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!