डोंबिवली ( शंकर जाधव ) : ठाणे जिल्ह्यात आपल्या समाजकार्याने प्रसिद्ध असलेले स्व. शिवाजी शेलार यांच्या आदर्शाची परंपरा कायम ठेवत त्यांचे चिरंजीव माजी नगरसेवक साई शेलार यांनी आपल्या वाढदिवसादिनी कल्याण येथील पारनाका जवळील नंदादीप फाउंडेशन अनाथआश्रममध्ये अन्नदान केले.
स्व.शिवाजी शेलार हे दरवर्षी खंबाळपाडा येथील पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत सहलीचे आयोजन करत होते. तसेच त्यांच्या दारी आलेल्या गोरगरिबांना मदत करत होते.स्व.शिवाजी शेलार यांनी आपल्या मुलांना समाजसेवेची शिकवण दिली आहे, त्याचे पालन करून त्यांचे चिरंजीव माजी नगरसेवक शाई शेलार यांनी यावर्षी आपल्या वाढदिवसादिनी केलेली मदत अनाथआश्रमातील लहान मुले आणि वृद्ध विसरु शकत नाही.
या अनाथआश्रमात ११० लहान मुले आणि ९ ज्येष्ठ नागरीक असून त्यांच्या सोबत भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली पूर्व मंडळ उपाध्यक्ष राजू शेख यांनी अनाथआश्रमात मुलांबरोबर बसून भोजन घेतले.