ठाणे

वाहन चार्जिंग स्टेशन उभारणे हि काळाची गरज – उद्योगमंत्री सुभाष देसाई

ठाणे दि.13: पेट्रोल,डिझेल ,या इंधनालाइलेक्ट्रीक वाहन हे उत्तम पर्याय असून भविष्या मध्ये इलेक्ट्रीक वाहनांची संख्या वाढविण्यासाठी इलेक्ट्रीक वाहन चार्जिग स्टेशनला प्रात्सोहन देणे हि काळाची गरज असल्याचे उद्योग आणि खनिकर्म,मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

मॅजेन्टा ग्रुप मार्फत भारतातील सर्वात मोठे चार्जिग स्टेशन तुर्भे येथे उभारण्यात आले आहे. या चार्जिग स्टेशनचे उदघाटन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले त्यावेळी श्री. देसाई बोलत होते.

यावेळी मॅजेन्टा ग्रुरुपचे व्यवस्थापक संचालक मॅक्सन लुईस तसेच मॅजेन्टा ग्रुपचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

इलेक्ट्रीक वाहने  पर्यावरण पुरक असुन त्या वाहनाचा  देखभालीचा खर्च सुध्दा कमी असल्याने भविष्यामध्ये पर्यावरण पुरक वाहनाची संख्या वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे.

तुर्भे येथील चार्जिग स्टेशन 24 तास कार्यरत असुन दुचाकी आणि चारचाकी वाहनासाठी 21 एसी/डीसी चार्जर उपलब्ध असणार आहेत.या ठिकाणी 45 मिनिटामध्ये वाहन चार्जिग होणार असून ज्या वाहनाना एसी स्लो चार्जिग आवश्यक आहे अशा वाहनासाठी वेगळी मार्गीका विकसित करण्यात आली आहे.हे सर्व चार्जर्स ऑनलाईन रिमोटद्वारे नियंत्रित,चार्जग्रीन ॲपद्वारे ऑपडेट केले असल्याने पुर्णपणे सुरक्षित असल्याचे उद्योगमंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!