कल्याण ( संतोष पडवळ ) : सुभाषचंद्र बोस संघटना ठाणे जिल्हा अध्यक्षपदी मंगलसिंग जितसिंग जुनी यांची आज निवड करण्यात आली आहे. उल्हासनगर, ४ नं. गेट, नेताजी सुभाष चौक येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रसंगी संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे, महीला आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष रजनीताई भोईटे, महाराष्ट्र अध्यक्ष वीष्णु जाधव, मराठवाडा अध्यक्ष महीला आघाडीचे सय्यद समरीन तोफीक, नाशिक जिल्हा अध्यक्ष महीला आघाडीचे जयश्री भांबरे, नाशिक जिल्हा अध्यक्ष आसाराम तांबे, कामगार आघाडीचे जालना शहर अध्यक्ष दसरत गुडेकर, माजीद अली खान, आयु पांसरी व अस्लम खान आदिंची उपस्थिती होती.