डोंबिवली ( शंकर जाधव ) : ठाकुर्ली कडून कल्याण दिशेकडे जाणाऱ्या सेवाग्राम एक्सप्रेस मध्ये दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला असून एक प्रवासी जखमी आहे. सुदैवाने या प्रवाशाच्या शेजारीच बसलेले एक पाच वर्षांचे बाळ मात्र बचावले आहे. दर एक ते दोन महिन्यात सातत्याने असा प्रकार घडत असल्याचे नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले. विशेष म्हणजे कल्याण स्थानकातील आरपीएफ जवानांनी या घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या प्रवाशांनी केला.
त्याच डब्यातील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी निघणारी सेवाग्राम एक्सप्रेस कल्याणच्या दिशेने जात असताना ठाकूर यांनी कल्याण स्थानकाच्या दरम्यान काही अज्ञात इसमांनी रेल्वे डब्यावर दगडफेक केली. यावेळी खिडकीत बसलेल्या एका प्रवाशाला दगड लागला .
तर प्रवाशाच्या बाजूला बसलेले एक पाच वर्षांचे बाळ या दगडफेकीत बचावले. सहप्रवाशांनी कल्याण खान का तू तरुण या सर्व घटनेची माहिती आरपीएफ जवानांना देण्याचा प्रयत्न केला मात्र रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी या घटनेकडे कानाडोळा करत ही रेल्वे पुढच्या स्थानकावर निघून जाईल तिथे कळवतो असे उत्तर दिले. त्यामुळे सहप्रवाशांनी त्यांच्या या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांच्या या दुर्लक्षित कारभारावर टीका करत दर एक ते दोन महिन्यांनी असे प्रकार घडत असतात अशी माहिती दिली.