ठाणे

दिव्यातील साबे गाव व दिवा- आगासन रस्त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून ठेकेदारांवर कारवाई करा – निलेश पाटील

दिवा : दिवा -आगासन या प्रमुख रस्त्याचे सिमेंट काँक्रीटचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने तो रस्ता तोडण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली त्याच बरोबर दिवा – साबे या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम देखील निकृष्ट दर्जाचे झाल्याने तो रस्ता देखील भाजपने आवाज उठवल्यानंतर तोडावा लागला. या गोष्टी गंभीर असून सार्वजनिक उपक्रमाचे काम निकृष्ट दर्जाचे करणाऱ्या ठेकेदाराला कडक शासन व्हायला हवे व त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी भाजप ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष निलेश पाटील यांनी ठाणे महापालिका आयुक्तांकड़े पत्राद्वारे केली आहे .

तसेच दिव्यातील वरील दोन्ही प्रमुख रस्त्याच्या कामाचे IIT मुंबई किवा VJTI यांच्या मार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे आणि त्याच बरोबर संबधीत ठेकेदार ची अनामत रक्कम जप्त करण्यात यावी आणि आर्थिक दंड लावण्यात यावा तसेच या प्रकल्पामध्ये junior engineer, Deputy engineer आणि exicutive engineer यांनी सदर निकृष्ट दर्जाच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल यांची विभागीय चौकशी करण्यात यावी अशी विनंतीवजा मागणीही पाटील यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे .

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!