ठाणे

नाल्यातील हिरवे पाणी निव्वळ योगायोग असल्याची उद्योजकांनी व्यक्त केली शक्यता

डोंबिवली ( शंकर जाधव ) : सोमवारी सकाळी गांधीनगर येथील नाला हिरवा झाल्याची बातमी समाजमाध्यमांतून प्रसारित झाली. मात्र हा निव्वळ योगायोग असून हे पाणी नेमके कसले,  याचा शोध घेणे सुरु असल्याची माहिती उद्योजकांनी दिली.

औद्योगिक क्षेत्रातील एखाद्या कंपन्यातील उत्पादनाचे   पावसाच्या पुरातील   पाण्यामुळे नुकसान झाल्यामुळे त्याचा रंग गांधीनगर येथील नाल्यात सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यातून गेल्यामुळे गांधीनगर येथील नाल्यातील वाहत्या पाण्यास हिरव्या रंगाचा तरंग दिसून आला असेल.अशी शक्यता उद्योजकांच्या वतीने व्यक्त केली आहे.  अशा घटना योगायोगाने होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाल्यातील पाण्याचे सॅम्पल टेस्टिंगसाठी पाठविण्यात आले असून त्यानंतर खरं स्पष्ट होईल. धुव्वादार पावसामुळे सगळीकडे पाणी तुंबण्याचे प्रकार झाले आहेत. येथील काही कंपन्यांमध्येही पाणी तुडुंब भरले होते. यामुळे काही ठिकाणी अशा तुंबलेल्या पाण्यामुळे त्या परिस्थितीत पाण्याला हिरवा रंग दिसून आला असेल. पण पुरपरिस्थितीत मुद्दाम मिश्रित पाणी सोडणार नाही कारण दरम्यान रस्तेही पाण्याने तुंबले होते. विशेष म्हणजे प्रदूषण नियंत्रण मंडळानेही अशा घटनेस दुजोरा दिला नाही. त्यामुळे गांधीनगर नाल्याचे केमिकल मिश्रित हिरवे पाणी ही पावसामुळे घडलेली शक्यता उद्योजकांच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

डोंबिवली सामान्य  सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प  जलप्रदूषण नियंत्रणबाबत पुर्ण कार्यक्षम आहे.  प्रदूषण बाबत नागरिकांनी भयभीत होउ नये.कामा संघटना , महाराष्ट्र औद्यौगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या वतीने काळजीपूर्वक पहाणी करण्यात येत असल्याचे उद्योजकांच्या वतीने सांगण्यात आले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!